Menu

स्तोत्रसंहिता 3

CBI

1 याहवेह, माझ्या शत्रूंची संख्या किती अधिक आहे! कितीतरी लोक माझ्याविरुद्ध उठले आहेत! 2 पुष्कळजण माझ्याबद्दल म्हणतात, “परमेश्वर त्याची सुटका करणार नाही.” सेला 3 परंतु याहवेह, तुम्ही माझ्या सभोवती ढाल आहात. माझे गौरव आणि माझी मान उंचाविणारे तुम्हीच आहात. 4 मी याहवेहचा धावा करतो, आणि ते त्यांच्या पवित्र पर्वतांवरून मला उत्तर देतात. सेला 5 मी पहुडतो आणि झोप घेतो; मी पुन्हा उठतो, कारण याहवेह माझे रक्षण करतात. 6 असंख्य मला चहूबाजूंनी वेढतील, तरी मला मुळीच भीती वाटणार नाही. 7 याहवेह, उठा! हे माझ्या परमेश्वरा, मला वाचवा! माझ्या सर्व शत्रूंच्या जबड्यांवर प्रहार करा; त्या दुष्टांचे दात पाडून टाका. 8 कारण सुटका याहवेहपासूनच आहे. तुमच्या लोकांवर तुमचा आशीर्वाद असो. सेला

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate