Menu

स्तोत्रसंहिता 131

IRV

1 हे परमेश्वरा, माझे हृदय गर्विष्ठ नाही किंवा माझे डोळे उन्मत्त नाही. मी आपल्यासाठी मोठमोठ्या आशा ठेवत नाही, किंवा ज्या माझ्या समजण्या पलीकडे आहेत अशा गोष्टीत मी पडत नाही. 2 खरोखर मी आपला जीव निवांत व शांत ठेवला आहे; जसे दूध तुटलेले बालक आपल्या आईबरोबर असते; तसा माझा जीव, दूध तुटलेल्या बालकासारखा माझ्या ठायी आहे. 3 हे इस्राएला, आतापासून आणि सर्वकाळ तू परमेश्वरावर आशा ठेव.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate