Menu

स्तोत्रसंहिता 14

IRV

1 मूर्ख आपल्या हृदयात म्हणतो, “देव नाही.” ते भ्रष्ट झाले आहेत आणि त्यांनी घृणास्पद अशी पापे केली आहेत. चांगले करणारा कोणीच नाही. 2 परमेश्वर स्वर्गातून खाली मनुष्य संतानास पाहतो की, कोणी एखादा तरी समजणारा आणि त्याच्यामागे चालणारा आहे काय? 3 प्रत्येकजण बहकून गेला आहे, ते सर्व गलिच्छ झाले आहेत. सत्कर्म करणारा कोणीही नाही, एकही नाही. 4 जे अन्याय करतात त्यांना काहीच ज्ञान नाही काय? ते भाकरी खातात तसे माझ्या लोकांस खातात; ते परमेश्वरास हाक मारत नाहीत? 5 परंतु ते भीतीने थरथर कापतील, कारण देव न्यायींच्या सभेत आहे. 6 तुम्ही गरीब मनुष्याचा अपमान करू इच्छित आहात, तरी परमेश्वर त्याचा आश्रय आहे. 7 अहा! सियोनातून इस्राएलाचे तारण आले तर किती बरे होईल! जेव्हा परमेश्वर त्याच्या लोकांस दास्यातून सोडवेल, तेव्हा याकोब आनंदी होईल आणि इस्राएल हर्ष करेल.

Everything we make is available for free because of a generous community of supporters.

Donate